एक वेगळाच प्रसंग | सोमेश आणि मी..

        आज कॉलेज मध्ये असताना एक वेगळाच प्रसंग आला. पण त्या प्रसंगा मुळे समजले आपण इंजिनीअर १२ हजारावर कंपनी मध्ये काम का करतो!  आणि का आज इंजिनिअर विद्यार्थ्यांना जॉब का नाही ! 

या प्रकाचे सर्व विचार एकदम मनात आले. आता असा हा कोणता प्रसंग असेल …? 

        कॉलेज लेब्ररी मध्ये पुस्तके रिनिवल करत असताना एक वर्ग मित्र मिळाला. तसे तर आम्ही दोघेही रेग्युलर कॉलेज करत नाही पण प्रथम वर्ष आम्ही थोडे रेग्युलर केले होते. या मूळ आमची त्यावेळेस ओळख झालेली होती. 

        लेब्ररी मध्ये बुक्स रिनिवल करत असताना अचानक वर्ग मित्र म्हणजेच सोमेश मला भेटला. हॅलो पासून सुरवात झाली, कसा आहे काय चालू आहे ! कॉलेज सोबत जॉब का इतर काही काम चालू आहे का ? या प्रकाची चर्चा सुरू होती.

         सोमेशन सांगितले की, कोरोना मुळे त्याचा फॅब्रिकेशन चा व्यवसाय बंद पडला. मार्केट मधून पैसे उचलून हा व्यवसाय चालूं केला होता पण लोक डाउन मध्ये सर्व बंद असल्याने आता कंपनी मध्ये जॉब सुरू आहे आणि आता हे शेवट च वर्ष पूर्ण करून काही मित्रांच्या ओळखी ने डिग्री पूर्ण करताच काही चांगल्या कंपनी मध्ये जॉब चा लगा लावून ठेवला आहे. आता फक्त लवकरात लवकर डिग्री पूर्ण होऊन जाऊ दे! 

     आता या वर मी जास्त काही न बोलता, फक्त शुभेच्या दिल्या आणि तुझ्या आयुष्यात सर्व काही चागले होऊ बोलून शांत होताच; सोमेश ने विचारले तुझा फायनल एअर चा प्रोजेक्ट काय आहे ? 

            आता प्रोजेक्ट चे नाव सांगितले पण सोमेशला समजले नसल्यामुळे माझ्या प्रोजेक्ट बद्दल सविस्तर पण थोडक्यात माहिती दिली. आणि त्याला त्याच्या प्रोजेक्ट बद्दल विचारले, या वर त्याने सांगितले मी थोडे उशील ऍडमिशन घेतले आहे. जॉब करत असल्यामुळे आणि आधीच कोरोना आता सुट्टी मिळणे सुद्धा किचकट झाले आहे. असे बोलून त्याने सांगितले मी, टीम प्रोजेक्ट मध्ये जॉईन होण्यासाठी सर्व शेवटच्या वर्षी असलेल्या मित्रानं सोबत चर्चा करत आहे.  ' जॉब मुळे मला वेळ नाही आणि जॉब सोडला तर कर्जाची परतफेड करणे मला अवघड होईल.


या मुळे, मी पैसे भरून टीम मध्ये जॉईन होऊन मिळेल त्या प्रोजेक्ट मध्ये जॉईन होणार आहे. 

    आता माझ्या कडे या उत्तरावर मी काय उत्तर देऊ ! अच्छा ठीक आहे म्हणून या विषयावर माझे बोलणे संपवून मी सोमेशला त्याच्या जुन्या व्यवसाय बद्दल विचारणा केली. 

        आता फॅब्रिकेशन मध्ये नेमके काय आणि कसे करतो! तसेच किती वर्षा पासून तू  हे काम करत आहे. तर या वर मला त्यांनी   मला फॅब्रिकेशन बद्दल बरीच चांगली माहिती दिली. 

            मग का एवढ्या चंगल्या प्रकारे त्याला फॅब्रिकेशन मध्ये माहिती असताना, फायनल इयर च्या  दुसऱ्या कोणत्या प्रकारच्या प्रोजेक्ट मध्ये का काम करतो. ' त्या पेक्षा अधिक प्रमाणात तू मेकॅनिकल विषयाचा उपयोग करून तू स्वतःचा व्यवसाय पुन्हा कसा सुरू करू शकतो या वर विचार कर आणि तुझ्या शेवटच्या वर्षा चा जो प्रोजेक्ट आहे, तो फॅब्रिकेशन वर अवलंबून कसा करता येईल या विषयावर पण काही दिवस चंगल्या प्रकारे विचार  कर आणि हो! कोरोना परिस्थिती मुळे, जे झाले ते झाले पण आता; नव्याने पुन्हा कसे तू अधिक चांगल्या पद्धतीने व्यवसाय सुरु करू शकतो या वर विचार चालू कर ! 

    आणि हो, तू ज्या मित्रांच्या भरवश्यावर कशी बशी डिग्री पूर्ण करून जो जॉब मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे पण तुला ओळखीने जास्तीत जास्त 20-25 हजार रुपय मिळेल पण जर तू तुझ्या प्रोजेक्ट फॅब्रिकेशन मध्ये करून नवीन काही करण्याचा प्रयत्न केला तर तुला तुझा व्यवसाय पुन्हा अधिक चंगल्या प्रकारे सुरू करण्याची संधी मिळेल. 

        एवढे बोलून मी सोमेश ला बोलून गेले आता बघ तुला , जॉब करून नोकर बनायचे का ! , स्वतःचा व्यवसाय पुन्हा सुरू करून मालक बनायचे आहे.' 

________

या विषयावर आमची चर्चा थोडी जास्तच रंगली, पण एक तात्पर्य या मधून निगाले. 

बरेच विध्यार्थी काहीतरी कारणांमुळे, मिळालेल्या संधीला अडचण, टेंशन समजून मिळालेल्या संधीला स्वतः लात मारतात. पैसे देऊन तर काम होतेच पण याचा परिणाम तर शेवटी आज काय झाला आहे हे तर आपल्या माहितीच आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments

Close Menu