साधारणपणे हा आजार ५ ते ७ दिवसांत आपोआप बरा होतो. पण काही जणांना रक्तस्रावाचा त्रास सुरू होतो. हिरड्या, नाक, जठर, आतडी यांतून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. जठरातून रक्तस्राव झाल्यास उलटीत रक्त दिसते. आतड्यातून रक्तस्राव झाल्यास विष्ठा काळसर दिसते. त्वचेवर रक्ताचे बारीक ठिपके दिसतात. प्रत्यक्ष रक्तस्राव व्हायच्या आधी पण हा दोष ओळखता येतो.
रक्तदाब मोजण्यासाठी आवळपट्टी बांधली व १०० पर्यंत दाब निर्माण केला तर त्या हातावर असे लहान ठिपके तयार होतात, यावरून प्लेटलेट्स कमी झाल्याचे समजते. रक्तस्राव जास्त झाल्यास रक्तदाब कमी होतो आणि रुग्ण अत्यवस्थ होतो. याची लक्षणे म्हणजे घाम येणे, हातपाय गार पडणे, नाडी जलद चालणे, इ.
रक्त तपासणीत रक्त कणिकांचे प्रमाण २० हजाराच्या खाली गेल्यास रक्तस्रावाचा धोका समजावा.
डेंग्यू तापाची चिन्हें आणि लक्षणे
- एकदम जोराचा ताप चढणे
 - डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे
 - डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते
 - स्नायू आणि सांध्यांमधे वेदना
 - चव आणि भूक नष्ट होणे
 - छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे
 - मळमळणे आणि उलट्या
 
डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप आणि शॉक सिंड्रोमची चिन्हे आणि लक्षणे
- डेंग्यू तापाप्रमाणेच लक्षणे
 - तीव्र, सतत पोटदुखी
 - त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे
 - नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे
 - रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे
 - झोप येणे आणि अस्वस्थता
 - रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते
 - नाडी कमकुवतपणे जलद चालते
 - श्वास घेण्याला त्रास होणे
 
डेंग्यूच्या प्रसाराचे चक्र
मनुष्य – डास – मनुष्य
डेंग्यू / डीएचएफचे भारतात विवरण
भारतात बहुतांश महानगरं आणि शहरांमधे हा रोग आढळून येतो.
हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा उद्रेक झाल्याचे वृत्त आहे.
संपर्क होण्याचा कालावधी
डेंग्यूची लागण झालेली व्यक्ती ही रोग होण्याच्या 6 ते 12 तास आधी डासांसाठी संक्रामक बनते आणि ही अवस्था 3 ते 5 दिवसांपर्यंत राहते.
प्रभाव पडणारे वय आणि लिंग गट
सर्व वयोगट आणि दोन्ही लिंगांच्या व्यक्तींवर याचा प्रभाव पडतो
डीएचएफच्या उद्रेकादरम्यान मुलांमधे मृत्युचे प्रमाण अधिक असते
डेंग्यू / डेंग्यू रक्तस्त्रावात्मक तापाचा कीटक
- एडीस इजिप्ती हा डेंग्यू / डेंग्यू रक्तस्त्रावात्मक तापाचा कीटक आहे
 - हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे 5 मिलीमीटर असतो.
 - हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला 7 ते 8 दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.
 
चावण्याच्या सवयी
- दिवसा चावतो
 - घरामधे आणि घराच्या आसपासच्या स्थितीत मनुष्यांवरच प्रामुख्याने जगतो
 - वारंवार चावतो
 
राहण्याच्या सवयी
- घरगुती आणि घराच्या आसपासच्या स्थितीत राहतो
 - घरांच्या अंधेर्या कोप-यांमधे, कपडे, छत्री इत्यादीसारख्या टांगलेल्या वस्तु किंवा लाकडी सामानाच्या खाली बसतो
 
पुनरुत्पादनाच्या सवयी
- एडीस इजिप्ती हा डास कोणत्याही भांड्यांमधे अथवा टाकीमध्ये शिल्लक असलेल्या अगदी थोड्या पाण्यातही वाढतो
 - एडीस इजिप्तीची अंडी पाण्याविना एक वर्षाहून अधिक काळ राहू शकतात
 
पुनरुत्पादनाच्या आवडत्या जागा
डेझर्ट कूलर्स, ड्रम, बरण्या, भांडी, बादल्या, फुलपात्रे, कुंडीखालील बशी, टाकी, बाटल्या, डबे, टायर्स, वळचण, फ्रीजचं पाणी साठण्याचं पात्र, सिमेंटचे ब्लॉक्स, मडकी, नारळाच्या करवंट्या, झाडातील ढोल्या आणि ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साठते किंवा साठवले जाते अशा अनेक जागा.
डेंग्यू / डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप
- उपचारांपेक्षा खबरदारी केव्हाही चांगली
 - डेंग्यू । डीएचएफच्या उपचारांसाठी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही
 - एडीस इजिप्ती डासावर नियंत्रण मिळवणे हाच एकमेव उपाय आहे
 - लवकर निदान होणे आणि रुग्णाची योग्य व्यवस्था पाहणे आणि लक्षणांनुसार उपचार करण्याने, मृत्युचा दर बराच कमी करता येतो.
 
डासाच्या नियंत्रणाचे उपाय
1.व्यक्तीगत प्रतिबंधक उपचार
- डास निवारक क्रीम्स, लिक्वीड, कॉईल्स, मॅट्स इत्यादी.
 - संपूर्ण बाही असलेले शर्ट आणि सॉक्ससहित संपूर्ण पँट घालणे
 - लहान बालकं आणि तरुण मुलांसाठी दिवसा मच्छरदाणीचा वापर करणे म्हणजे त्यांना डास चावणार नाहीत
 
2. जैवशास्त्रीय नियंत्रण
- शोभेच्या टाक्यांमधे, कारंजा इत्यादींमधे डासांच्या अळ्या खाणारे मासे पाळणे
 - जैविक कीटनाशकांचा वापर करणे
 
3. रासायनिक नियंत्रण
- मोठ्या टाक्यांमधे पुनरुत्पादन आढळल्यास तेथे अबेटसारख्या रासायनिक अळीनाशकांचा वापर करणे
 - दिवसा एरोसोल स्प्रेचा वापर करणे
 
4. पर्यावरणात्मक व्यवस्थापन आणि स्रो कपात पध्दती
- डासांच्या पैदाशीच्या होण्याच्या जागा शोधून काढून त्या नष्ट करणे
 - घराचे छत, वळचण आणि सावलीच्या जागांचे व्यवस्थापन
 - साठवलेल्या पाण्यावर योग्य आच्छादन
 - खात्रीशीर पाणी पुरवठा
 - आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळणे
 - आरोग्य शिक्षण
 - टीव्ही, रेडीयो, सिनेमा स्लाईड्स यांसारख्या विविध माध्यमातून हा रोग आणि त्याला कारणीभूत होणारा डास यांच्याबाबत सामान्य लोकांना माहिती देणे.
 - समुदाय सहभाग
 - डेंग्यूच्या रुग्णाचे व्यवस्थापन
 
एडीसच्या पैदास होण्याच्या जागा शोधून काढून त्या नष्ट करण्यासाठी लोकांना संवेदनशील करणे आणि सहभागी करुन घेणे
- संशयित डेंग्यू तापाची लवकर नोंद घेणे
 - डेंग्यूच्या तापाचे व्यवस्थापन हे लक्षणांनुसार आहे आणि आधारात्मक आहे
 - डेंग्यू शॉक सिंड्रोममधे, पुढील उपचारांची शिफारस केली जातेः
 - प्लाज्माचे नुकसान भरुन काढणे
 - इलेक्ट्रोलाईट आणि चयापचयाच्या गडबडीत दुरुस्ती करणे
 - रक्त चढवणे
 
काय करावे आणि काय करु नये
- आठवड्यातून किमान एकदा कूलर्समधून आणि इतर लहान भांड्यामधून पाणी काढून टाकावे
 - दिवसा डास चावू नयेत म्हणून एरोसोलचा वापर करावा
 - पाय आणि हात उघडे राहतील असे कपडे वापरु नका
 - मुलांना लहान चड्ड्या आणि अर्धी बाही असलेल्या कपडे घालून खेळू देऊ नका
 - दिवसा झोपतेवेळी मच्छरदाणी किंवा डास निवारक वापरावेत.
 
प्रयोगशालेय निदान
- चिकित्सकाने तापमान मोजावे, एकदा धमनीवर पट्टा बांधण्याची टूनिकेट् चाचणी करावी आणि नीलत्वचा आहे का ते पाहावे.
 - तापासह रक्तस्त्राव होणा-या सर्व रुग्णांची सखोल तपासणी करुन त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्स पेशींची संख्या कमी झाली आहे का ते पाहावे.
 - शॉकच्या प्रकरणी, ओटीपोट किंवा छातीमधे थोडा द्राव आहे का ते शोधण्यासाठी चाचण्या कराव्यात.
 
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

0 Comments