चल ना मित्रा तुला
पोलीस दाखवतो
जो तो बघ कसा
त्याच्यावर रागावतो।।
बघ तरी तो पोलिस
रस्त्यावर कसा खातो
डबा खाताना बघ ना
त्यात कचरा ही जातो।।
अरे तिकडे तर सदा
पोलिस असतो तैनात
म्हणून तर सारी जनता
झोपत असते चैनात।।
रात्रभर जागून बिचारा
आता कुठे तो पडलाय
इतक्यात कोणीतरी रे
त्याचा फोटो काढलाय।।
पोलिस झोपलाय हे
तर साऱ्यानी पाहीलंय
पण सतत अठरा तास
राबतोय हे कुठे पाहीलंय।।
चल ना रे मित्रा तुला
पोलिस बाप दाखवतो
कश्या कष्टात मुलाला
पोलिस दादा वाढवतो।।
पालक सभेत पोलिस
कधी तरी तुला दिसतो
मुलाच्या आईचाच तर
नेहमी सहभाग असतो।।
बघ तरी डोळे उघडून
कसा उभा आहे उन्हात
पोटात काही नसूनही
बंदोबस्ताला आहे तैनात।।
अजून थोडे घे ना श्रम
पोलिसांची तब्येत पहा
खाणे झोपणे असे अवेळी
म्हणे आरोग्यपूरक रहा।।
कसा ठेवेल सांग ना तो
तब्येतीचा ताळमेळ
झोप अन जेवणाचीच
नसेल काही काळवेळ।।
चल ना रे पोलिसचे
हे ही पहा ना रुप
नसतांनाही चूक
कसा बसतो चूप।।
मित्रा तू तरी कधी
मान्य केलीस का चूक
जेव्हा तोडता सिग्नल
पोलीस म्हणतो रुक।।
पोलिसांशी अनेकांना
पाहिले करतांना वाद
कधी मित्रा पोलिसांना
दिले का धन्यवाद?।।
मित्रा सहानुभूती मिळावी
ही बिलकुल नाही अपेक्षा
बस कारणाशिवाय नको
करू पोलीसांची उपेक्षा।।
🙏!! जय हिंद !!🙏
#पोलीस_भरती #महाराष्ट्र_पोलीस #पोलीस_भर्ती_मार्गदर्शन #पोलीस भरती तयारी
सोर्स : सदर पोस्ट स्वयं लिखित नसून , व्हाट्सअप्प द्वारे मिळालेली आहे
0 Comments